ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासात मोलाचं योगदान देणारे ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू मारिओ झगालो यांचं वृद्धापकाळानं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून चार विश्वचषक जिंकणारे दिग्गज फुटबॉलपटू अशी मारिओ झगालो यांची ओळख होती.
अधिक माहिती
● 1958 आणि 1962 या दोन्ही वर्षातल्या विश्वविजयी संघाचे ते भाग होते.
● 1970 मध्ये त्यांनी ब्राझील संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करताना, पेले, झैरझिन्हो आणि कार्लोस अल्बर्टो यांचा समावेश असलेल्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षित केलं होतं.
● झगालो यांनी कार्लोस अल्बर्टो परेरा यांच्यासह सहायक प्रशिक्षक म्हणून 1994 मध्येही संघाला विश्वचषक मिळवून दिला होता.
● त्यानंतर ब्राझील संघाचे व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत राहिले.
● खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकून देणारे ते ब्राझीलचे एकमेव खेळाडू आहेत.
● असा पराक्रम जर्मनीच्या फ्रांझ बेकेनबावा आणि डिडिएर डेशॅम्प्स यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.