Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भगवद्गीतेला युनोस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये स्थान Bhagavad Gita included in UNESCO’s Memory of the World Register

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • April 2025
  • भगवद्गीतेला युनोस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये स्थान Bhagavad Gita included in UNESCO’s Memory of the World Register
Bhagavad Gita included in UNESCO's Memory of the World Register

● भगवद्गीता आणि भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ या ऐतिहासिक ग्रंथांच्या हस्तलिखितांना ‘युनेस्कोच्या मेमरी ऑफ दि वर्ल्ड रजिस्टर’मध्ये स्थान मिळाले आहे.
● यंदा या रजिस्टरमध्ये एकूण 74 ऐतिहासिक दस्तऐवजांचा समावेश करण्यात आला असून, त्यात गीता आणि नाट्यशास्त्र या महाग्रंथांचाही समावेश आहे.
● वैज्ञानिक महाक्रांती, महिलांचे इतिहासातील योगदान आणि अन्य 72 देशांतील विविध क्षेत्रातील ऐतिहासिक सहकार्यासह चार आंतरराष्ट्रीय संघटनांचाही
या रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती ‘युनेस्को’कडून देण्यात आली आहे.
● ‘युनेस्को’च्या रजिस्टरमध्ये विविध प्रकारचे ग्रंथ, हस्तलिखिते, नकाशे, छायाचित्रे, विविध प्रकारच्या ध्वनिफिती आणि ध्वनिचित्रफिती यांचा समावेश आहे.
● जगभर अठरा एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली आहे.
● युनेस्कोने ‘मेमरी ऑफ दि वर्ल्ड रजिस्टर’मध्ये ७४ नव्या डॉक्युमेंटरी हेरिटेज कलेक्शनचा समावेश केला असून त्यामुळे आतापर्यंत गोळा करण्यात आलेल्या
विविध दस्तऐवजांची संख्या ५७० वर पोचली आहे.
● ‘युनेस्को’च्या या रजिस्टरमध्ये एखादा ग्रंथ किंवा साहित्यकृती यांचा समावेश करण्याआधी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती विविध नामांकनांचे
मूल्यमापन करते त्यानंतर ‘युनेस्को’च्या कार्यकारी मंडळाला याबाबत शिफारशी केल्या जातात.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *