भारताच्या रमेश बाबू वैशालीने भाऊ प्रज्ञानंद पाठोपाठ ग्रॅंडमास्टर किताबावर नाव कोरले आहे. वैशालीने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म ऑक्टोबरमध्ये झालेल्या कतार मास्टर स्पर्धेत पूर्ण केला होता. मात्र तिचे एलो गुणांकन 2500 पेक्षा कमी होते त्यामुळे ग्रँडमास्टर किताबासाठी तिला हा टप्पा गाठणे गरजेचे होते.
• एलो ब्रिगरात स्पर्धेतील कामगिरीमुळे तिची लाईव्ह रेटिंग 2500 झाले आणि तिने ग्रँड मास्टर किताबावर नाव कोरले.
• स्पेन मधील स्पर्धेत वैशालीने तुर्कीएच्या तामेर तारीख सेलबेसचा दुसऱ्या फेरीत पराभव केला आणि 2500 एलो रेटिंग पार केले.
• बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर किताब मिळवणारे ते पहिलेच बहिण भाऊ ठरले आहेत.
• वैशाली भारताची 84 वी ग्रँड मास्टर ठरली.
• ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली तिसरी भारतीय महिला ठरली.
• यापूर्वी कोनेरू हम्पीने 2002 मध्ये, तर द्रोनावली हरिकाने 2011 मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळवला होता.
• ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली 42 वी महिला खेळाडू ठरली.
• यावर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली दुसरी महिला खेळाडू ठरली.
• यापूर्वी यावर्षी एप्रिलमध्ये चीनच्या झू जिनरने हा किताब मिळवला होता.


