राज्याच्या वनविभागाच्या चार विक्रमांची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. आता 65 हजार 724 रोपट्यांतून ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवून शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
अधिक माहिती
• चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने 1 ते 3 मार्च या कालावधीत ‘ताडोबा महोत्सव 2024’ आयोजन करण्यात आले आहे.
• या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून जागतिक विक्रम करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.
• हा संकल्प चंद्रपुरातील रामबाग येथे साकारण्यात आला.
• 26 प्रजातींच्या तब्बल 65,724 रोपट्यातून भारतमाता या शब्दाची निर्मिती केली या विक्रमाची नोंद घेत गिनीस बुक चे प्रमाणपत्र मिळाले आहे.