Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारताचे ‘चांद्रयान 4’ 2027 मध्ये झेपावणार

भारताचेचांद्रयान 4′ 2027 मध्ये झेपावणार

 

  • भारत 2027 मध्ये ‘चांद्रयान 4’ ही मोहीम राबविणार असून, चंद्रावरील खडकांचे नमुने या मोहिमेंतर्गत पृथ्वीवर आणले जातील, अशी माहिती विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री जितेंद्रसिंह यांनी दिली.
  • त्याचप्रमाणे ‘चांद्रयान 4’ मोहिमेत अवजड ‘एलव्हीएम-3’ प्रक्षेपकाचे किमान दोन वेळा स्वतंत्ररीत्या प्रक्षेपण केले जाईल.
  • या प्रक्षेपकातून पाच वेगवेगळे घटक अवकाशात नेले जातील आणि ते कक्षेत एकत्रित जोडले जातील.
  • चंद्राच्या पृष्ठभागावरून खडकाचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचा चांद्रयान 4 या मोहिमेचा हेतू आहे
  • भारत पुढील वर्षी ‘गगनयान’ मोहिमेच्या माध्यमातून विशेष रचना केलेल्या अवकाशयानातून भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या खालील कक्षेत पाठवणार असून या अंतराळवीरांना पुन्हा सुखरूपरित्या पृथ्वीवर परत आणले जाईल.
  • गगनयान या मनुष्यरहित मोहिमेतून ‘व्योमित्र’ नावाचा यंत्रमानवही अवकाशात पाठविला जाईल.”

सागरी संशोधनासाठीसमुद्रयान

  • 2026 मध्ये ‘समुद्रयान’ प्रक्षेपित केले जाणार असून या मोहिमेंतर्गत समुद्राच्या तळाचा शोध घेण्यासाठी तीन शास्त्रज्ञांना पाणबुडीतून समुद्रात सहा हजार मीटर खोलीवर पाठविले जाईल.
  • ‘गगनयान’ मोहिमेसह इतर मोहिमांच्या काळातच ही कामगिरी होईल. त्यामुळे, देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग साधला जाईल.
  • ‘समुद्रयान’ मोहिमेतून समुद्रातील महत्त्वाची खनिजे, दुर्मीळ धातू आणि सागरी जैवविविधतेसह मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्तीचे दरवाजे खुले होतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *