भारतीय नौदल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर यांनी नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
उद्देश
• यामधून या दोन्ही संस्थांची तंत्रज्ञान विकास, नवोन्मेषी उपाय आणि संयुक्त संशोधन आणि विकास याला प्रोत्साहन देण्यासाठीची वचनबद्धता स्पष्ट होते.
• हे धोरणात्मक सहकार्य भारतीय नौदल आणि आयआयटी खरगपूरच्या गटांचा समावेश असलेल्या संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रमांवर केंद्रित आहे. लोणावळा येथील आयएनएस शिवाजी द्वारे या सामंजस्य करारासाठी समन्वय साधला जाईल.
• हा सामंजस्य करार शैक्षणिक संस्था आणि भारतीय लष्कर यांची प्रतिकात्मक नातेसंबंधाच्या दिशेने वाटचाल दर्शवत असून, यामुळे नवोन्मेष आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.