आपल्या 28 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात भारतीय महिला संघाने प्रथमच घरच्या क्रिकेट मौसमाचा शेवट विजयाने केला. वानखेडे मैदानावर पार पडलेल्या एकमेव कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेटने मात करीत विजय नोंदवला. हा भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील पहिला महिला कसोटी विजय ठरला.
अधिक माहिती
• 1984 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात पहिली कसोटी झाली होती.
• त्यानंतर आतापर्यंत या संघात 11 कसोटी झाल्या, त्यात सहा लढती अनिर्णित राहिल्या. चार लढती ऑस्ट्रेलियाने जिंकल्या भारताने एकमेव लढत जिंकली.
• मायदेशात भारतीय महिला संघाने सलग तिसरी कसोटी लढत जिंकली.
• याआधी डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या कसोटीत भारताने इंग्लंडवर 347 धावांनी मात केली होती.
• त्याआधी 2014 मध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 34 धावांनी विजय मिळवला होता.
• मायदेशात भारतीय महिला संघाने चौथा कसोटी विजय नोंदवला.
• ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला हरविण्यापूर्वी भारतीय महिला संघाने सर्वप्रथम कसोटी विजय हा 1976 यावर्षी पाटण्याला वेस्ट इंडिज संघाविरुद्ध नोंदविला होता.
• भारतीय महिला संघाने मायदेशात चार तर परदेशात तीन कसोटी लढती जिंकल्या.
• ऑस्ट्रेलियाच्या या विजयाबरोबर भारतीय महिला संघाने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण सातवा विजय नोंदवला.
• भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात स्नेहा राणा ही सामन्याची मानकरी ठरली.
• भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक: अमोल मुजुमदार