Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय महिलांचा 603 धावांचा विश्वविक्रम

  • Home
  • Current Affairs
  • भारतीय महिलांचा 603 धावांचा विश्वविक्रम
  • शेफाली वर्माचे द्विशतक, स्मृती मानधनाचे शतक आणि जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, रिचा घोष यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात विक्रमी 603 धावांवर डाव घोषित केला.
  • एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये ही लढत सुरू आहे.
  • महिला कसोटी क्रिकेटमध्ये सहाशे धावांचा टप्पा पार करणारा भारत पहिलाच संघ ठरला.
  • भारताने 6 बाद 603 धावा केल्या. यासह भारतीय महिलांनी 603 ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम मोडला.
  • यावर्षी फेब्रुवारीत पर्थला ऑस्ट्रेलिया महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 बाद 575 धावा करून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.
  • भारतीय संघाने डावात एकूण 80 चौकार लगावले. हे कसोटी सामन्यात एका डावात लगावले गेलेल सर्वाधिक चौकार ठरले.
  • याबाबतीत भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला. या वर्षी पर्थला झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात 78 चौकार लगावले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *