Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मलेरियाविरुद्ध लस विकसित Indian Council of Medical Research develops vaccine against malaria

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • August 2025
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मलेरियाविरुद्ध लस विकसित Indian Council of Medical Research develops vaccine against malaria
Indian Council of Medical Research develops vaccine against malaria

● भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली जैविक-वैद्यकीय संस्था ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ (आयसीएमआर) ने मलेरियाविरोधी ‘रिकॉम्बिनंट काइमेरिक मल्टी-स्टेज मलेरिया लस’ (अॅडफॅल्सिवॅक्स) ही नवी लस विकसित केली आहे.
● मलेरिया परजीवीवर त्याच्या जीवनचक्रातील विविध टप्प्यांवर एकाच वेळी आघात करणारी व जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेली प्रगत लस असून, या लशीचे उत्पादन करण्यासाठी इच्छुक कंपन्या व उत्पादकांना पुढे येण्याचे ‘आयसीएमआर’ने आवाहन केले आहे. त्यामुळे लवकरच भारताला मलेरियावरील लस मिळू शकणार आहे.
● मलेरिया हा डासांमार्फत पसरणारा जीवघेणा आजार आहे.
● हा प्रामुख्याने ‘प्लॅइमोडियम फॅल्सिपरम’ आणि ‘प्लॅझ्मोडियम विवॅक्स’ या परजीवींमुळे होतो.
● संसर्गित अॅनाफिलीस डासांची मादी चावल्यावर हा आजार पसरतो.
● साधारणपणे डास चावल्यानंतर १० ते १५ दिवसांनी ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसतात. गंभीर प्रकरणांमध्ये अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, मेंदूवर परिणाम किंवा मृत्यूही होऊ शकतो.
● मलेरियावर सध्या भारतात लस उपलब्ध नाही.
● दरवर्षी मलेरियाने देशात सरासरी २० लाख रुग्ण आढळतात व ७० ते ८० मृत्यू होतात.
● त्यावर लस आल्यास याचा प्रसार होणार नाही. खास करून महाराष्ट्रात गडचिरोली येथे या रुग्णांची संख्या जास्त आहे.
● ही लस उत्पादित करण्यासाठीचे तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यास ‘आयसीएमआर’ इच्छुक असून, त्यासाठी उत्पादकांनी याबाबत संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
● यामध्ये ही लस तयार करण्याची पद्धत, लागणारे घटक, उत्पादनाची पायरी-पायरीची माहिती, गुणवत्ता तपासणीचे नियम आणि उत्पादनासाठी लागणारा आराखडा हे सर्व संबंधित लस निर्मिती करणाऱ्या कंपनीला दिले जातील.
● ही लस ‘आयसीएमआर’च्या भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आली आहे.
● सध्या या लसीची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि विक्रीसाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
● भारतामध्ये मलेरियाचे 1947 पासून दरवर्षी सुमारे 7..5 कोटी रुग्ण आणि 8 लाख मृत्यू व्हायचे.
● परंतु, उपचारांच्या प्रगतीमुळे 2023 मध्ये ही संख्या घटून सुमारे 20 लाख रुग्ण आणि 83 मृत्यू अशी आकडेवारी झाली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *