Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव

भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव

भारतओमान संयुक्त लष्करी सराव

  • भारत-ओमानसंयुक्त लष्करी सराव अल नजाहच्या पाचव्या  फेरीसाठी भारतीय सैन्य दल ओमानला रवाना
  • हा सराव 13 ते 26 सप्टेंबर 2024 दरम्यान सलालाह, ओमान येथील रबकूट प्रशिक्षण विभाग येथे होणार आहे.
  • अलनजाह हा सराव 2015 पासून भारत आणि ओमान दरम्यान दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो.
  • यासरावाची यापूर्वीची सराव फेरी राजस्थानमधील महाजन येथे आयोजित करण्यात आली होती.
  • 60 कर्मचाऱ्यांचासमावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या बटालियनसह इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा यामधील कर्मचाऱ्यांनी केले आहे.
  • ओमानच्यारॉयल आर्मीमध्येही 60 जवानांचा समावेश असून, ते फ्रंटियर फोर्सच्या तुकड्यांचे प्रतिनिधित्व करतील.

उद्दिष्ट:

  • संयुक्तराष्ट्रांच्या चार्टरच्या VII व्या कारवाईअंतर्गत दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हे या संयुक्त सरावाचे उद्दिष्ट आहे.
  • वाळवंटातीलवातावरणात कशा पध्दतीने काम करावे यावर हा सराव लक्ष केंद्रित करेल.
  • यासरावाच्या दरम्यान होणाऱ्या सामरिक कवायतींमध्ये जॉइंट प्लॅनिंग, कॉर्डन आणि शोधमोहीम, फाईटिंग इन बिल्ट अप एरिया, मोबाईल व्हेईकल चेक पोस्टची स्थापना, काउंटर ड्रोन आणि रूम इंटरव्हेंशन इत्यादींचा समावेश आहे.
  • जगातीलदहशतवादविरोधी मोहिमांचे प्रत्यक्ष अनुकरण करणारे एकत्रित क्षेत्रीय प्रशिक्षण सराव देखील यावेळी नियोजित केले गेले आहे.
  • अलनजाहच्या पाचव्या सरावात दोन्ही बाजूंनी संयुक्त  कारवाई करण्यासाठी  रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धतींमधील सर्वोत्तम सरावांची देवाणघेवाण करण्यात  येईल.
  • हेदोन्ही सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमता, सद्भावना आणि सौहार्द वाढवेल. याशिवाय, या संयुक्त सरावामुळे संरक्षण सहकार्य मजबूत होईल आणि दोन्ही मित्र राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *