भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंध हे परस्पर सन्मान, संयुक्त मूल्ये आणि वाढत्या भागीदारीला दर्शविणारे आहेत असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 10 डिसेंबर 2023 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
अधिक माहिती
● दोन्ही देशांदरम्यान विशेष राजनैतिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्यासोबत मिळून काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
● यापूर्वी सप्टेंबर महिन्यात दक्षिण कोरियाचे राजदूत चांग जे-बोक यांनी भारतातील उच्च मूल्याच्या प्रकल्पांसाठी पुढील तीन वर्षांमध्ये 4 अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा केली होती.