Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत-न्यूझीलंड यांच्यात महत्वपूर्ण करार

Important agreement between India and New Zealand

● भारत आणि न्यूझीलंडदरम्यान संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासंबंधी, तसेच हिंद-प्रशांत महासागरी प्रदेशामध्ये सहकार्याला चालना देण्यासंबंधी करार करण्यात आला.
● भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यासंबंधी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
● मोदी आणि लक्सन यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान सहा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
● त्यामध्ये संरक्षणासह शिक्षण, क्रीडा, कृषी आणि हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच संरक्षण उद्योग क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी आराखडा तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
● दोन्ही देशांदरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्याला चालना देणे हा त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश आहे.
● भारत व न्यूझीलंडदरम्यान मुक्त व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्यात आल्या.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *