भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) यांच्यातील त्रिपक्षीय. सहकार्याने इतिहासात नवीन मैलाचा दगड गाठला असून तिन्ही देशांच्या नौदलांनी पहिलावहिला त्रिपक्षीय संयुक्त सागरी सराव यशस्वीपणे पूर्ण केला. 7 आणि 8 जून 23 रोजी हा सराव करण्यात आला.
या प्रात्यक्षिकाच्या पहिल्या आवृत्तीच्या दरम्यान, सहभागी नौदलांनी सागरावर युद्धाभ्यास केला ज्यात तोफांद्वारे वेध घेण्याचे डावपेच आणि क्षेपणास्त्रांच्या वापरासंबंधी कवायती, अगदी जवळून वापरायचे डावपेच, फ्रेंच विमान राफेल आणि यूएईच्या डॅश 8 एमपीए यांचा सहभाग असलेली प्रगत हवाई संरक्षण प्रात्यक्षिके, हेलिकॉप्टरने क्रॉस लँडिंग संचालन, सागरावर इंधन भरण्याच्या कवायती यांचा समावेश होता.


