Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत – ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार Free trade agreement between India and Britain

Free Trade Agreement between India and Britain

● भारत आणि ब्रिटनमधील ‘मुक्त व्यापार करार’ अस्तित्वात आला.
● पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या साक्षीने वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
● करारामुळे भारतातील बहुतांश उत्पादनांना ब्रिटनमध्ये करमुक्त प्रवेश मिळेल, तर ब्रिटनमधील चारचाकी वाहने, मद्य आदी स्वस्त होईल.
● ‘सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार’ (इकोनॉमिक अँड ट्रेड अॅग्रिमेंट – सीईटीए) असे नाव असलेल्या या करारामुळे भारतीयांना मोठ्या संधी उपलब्ध होतील.

कराराची वैशिष्ट्ये

● येत्या तीन वर्षांत ब्रिटनला होणाऱ्या कृषी उत्पादन निर्यातीत २० टक्के वाढ अपेक्षित.
● ब्रिटनमधून गुंतवणूक वाढल्याने देशांतर्गत रोजगार निर्मितीला बळ.
● ब्रिटनमधील सुमारे ७५ हजार भारतीयांना ‘सामाजिक सुरक्षा शुल्का’तून तीन वर्षांसाठी सूट.
● ब्रिटनमधून आयात होणारी वाहने, मद्य आदी उत्पादनांचे सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर.
● भारतातील ९९ टक्के निर्यातीला ब्रिटनमधील व्यापार करातून १०० टक्क्यांपर्यंत सूट.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *