भारत मोझांबिक टांझानिया (आयएमटी) ट्राय लॅटरल (ट्रायलेट) या दुसऱ्या संयुक्त सरावात आयएनएस तीर आणि आयएनएस सुजाता, या भारतीय युद्धनौका सहभागी होणार आहेत. 21 ते 29 मार्च 2024 दरम्यान, हा संयुक्त सागरी सराव होणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या आयएमटी ट्रायलेट या पहिल्या सरावात टांझानिया आणि मोझांबिकच्या नौदलासह आयएनएस तरकश या युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. या युद्धसरावाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे.
अधिक माहिती
• बंदरावरचा टप्पा 21 ते 24 मार्च 24 दरम्यान होणार आहे, ज्यात, नौदलाच्या तीर आणि सुजाता या युद्धनौका, झांजीबार (टांझानिया) आणि मापुटो (मोझांबिक) या बंदरांवर संबंधित नौदलांबरोबर सहभागी होतील.
• टप्प्याची सुरुवात नियोजन परिषदेने होईल, त्यानंतर हानी नियंत्रण, अग्निशमन, बोर्ड सर्च ला भेट आणि जप्ती प्रक्रिया, वैद्यकीय विषयांवरील व्याख्याने, अपघातग्रस्त भागातील बचावकार्य आणि डायव्हिंग ऑपरेशन्स यासारख्या संयुक्त बंदर प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
• या सरावाचा सागरी टप्पा 24-27 मार्च 24 रोजी होईल, ज्यात, विषम धोक्यांचा सामना करणे, बोर्ड सर्चला भेट आणि जप्ती प्रक्रिया, नौका हाताळणी आणि गोळीबार सराव यांचा समावेश आहे.
• नकाला (मोझांबिक) इथे नियोजित संयुक्त चर्चासत्राने या सरावाची सांगता होईल.
• बंदरावरील तळावर असतांना भारतीय जहाजे, अभ्यागतांसाठी खुली केली जातील तसेच यजमान नौदलासोबत, ही जहाजे क्रीडा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीत सहभागी होतील.
• 106 एकात्मिक अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या सागरी प्रशिक्षणार्थींच्या भेटी देखील या बंदरांवर होणार आहेत.