● सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने (एसडीएएल) विकसित केलेल्या, स्वदेशी बनावटीच्या ‘भार्गवास्त्र’ या कमी खर्चाच्या ड्रोनविरोधी प्रणालीची नुकतीच
यशस्वी चाचणी करण्यात आली.
● ड्रोनद्वारे व्यापक हल्ल्याला तोंड देण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
● या ड्रोनविरोधी प्रणालीतील मायक्रो-रॉकेटची ओडिशातील गोपालपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंज येथे कठोर चाचणी घेण्यात आली.
● यामध्ये रॉकेटने सर्व निर्धारित उद्दिष्टे साध्य केली. आर्मी एअर डिफेन्स (एएडी) विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ड्रोनविरोधी रॉकेटच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या.
● यापैकी दोन चाचण्या प्रत्येकी एक रॉकेट डागून घेण्यात आल्या. तर तिसऱ्या चाचणीत दोन सेकंदांत, एकापाठोपाठ एक दोन रॉकेट डागण्यात आली.
असे आहे भार्गवास्त्र
● अनमॅन्ड एरियल व्हेइकल अर्थात ड्रोनचा वेध घेण्याची क्षमता
● 2.5 किमीपर्यंत अंतरावरील, चाल करून येणारे लहान ड्रोन शोधून नष्ट करण्याची क्षमता
दोन स्तरांत संरक्षण
● यामध्ये संरक्षणाचा पहिला स्तर म्हणून अनगाइडेड मायक्रो-रॉकेटचा वापर, हे २० मीटरच्या त्रिज्येतील ड्रोनच्या ‘धाडीला’ निष्क्रिय करू शकते.
● तर संरक्षणाचा दुसरा स्तर म्हणून अचूक, प्रभावी गाइडेड मायक्रो-मिसाइलचा वापर
पाच हजार मीटरहून अधिक उंचीवर कार्य करण्याची क्षमता
● समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर तसेच विविध भूभागांमध्ये सहज तैनात करता येते. त्यामुळे भारतीय सेनादलांच्या विशिष्ट
कारवायांसाठी उपयुक्त.
● ही प्रणाली मॉड्युलर असल्याने सेन्सर (रडार, ईओ आणि आरएफ रिसीव्हर) आणि शूटर यांची गरजेनुसार जोडणी करता येते. याद्वारे लांबपल्ल्याच्या
लक्ष्याचाही वेध घेणे शक्य होते.
● प्रगत सी4आय (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स, कॉम्प्युटर्स आणि इंटेलिजन्स) तंत्रज्ञानावर आधारित रडार सहा ते 10किमी अंतरावरील सूक्ष्म हवाई धोके
शोधू शकते.