पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी (FIDF) आणखी 3 वर्षांसाठी म्हणजेच 2025-26 पर्यंत वाढवण्याला मान्यता दिली आहे. 7522.48 कोटी रुपयांच्या आधीच मंजूर करण्यात आलेला निधी तसेच 939.48 कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय सहाय्य या निधीला लाभले आहे.