विजय दिवस
- भारतात विजय दिवस दरवर्षी 16 डिसेंबरला साजरा केला जातो.
- 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या युद्धाची परिणती बांगलादेशच्या स्वातंत्र्यात झाली.
- या दिवशी देश सशस्त्र दलांच्या शौर्य आणि बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करतो.
- बांगलादेशमध्येही विजय दिवस साजरा केला जातो. बांगलादेश मुक्ती युद्ध आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यातील पाकिस्तान सशस्त्र दलांच्या पराभवाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
मधुमेहासाठी देशात पहिली बँक सुरू
- भारतात आनुवंशिकता, चुकीची जीवनशैली व अयोग्य आहारामुळे मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनच्या (एमडीआरएफ) सहकार्याने स्थापना केली आहे.
- या बँकेत मधुमेही रुग्णांच्या जैविक नमुन्यांचा संग्रह असून मधुमेहासंदर्भातील वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्याचा या बँकेचा हेतू आहे.
- आयसीएमआरच्या परवानगीने वैज्ञानिक अभ्यासाला मदत करण्यासाठी ही बँक उभारण्यात आली आहे.
यूके बायोबँकेचा आदर्श
- आज जगभरात जैविक बँका उपलब्ध असून ब्रिटनमधील यूके बायोबँक यात सर्वांत प्रसिद्ध आहे.
- नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या सहकार्याने काम करणाऱ्या या बायोबँकेत पाच लाख जणांचा जैववैद्यकीय डेटा आहे. यात आनुवंशिकता, जीवनशैली व आरोग्याशी संबंधित माहितीचा समावेश आहे.