Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.

अल्पपरीचय
● जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला.
● त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली.
● मनोहर जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते आणि नंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले.
● 1980 च्या दशकात मनहोर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले.
● मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते.
● मनोहर जोशी यांनी 1970 च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
● 1976 ते 1977 या काळात मुंबईचे महापौरही होते.
● मनोहर जोशी यांनी 1995-1999पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
● ते महाराष्ट्राचे 12 वे मुख्यमंत्री होते.
● अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना 2002-04 साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले.
● मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले.
● राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे काम केले.
● मनोहर जोशी हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *