मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
- पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- माहितीव प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयाची औपचारिक घोषणा केली.
- मराठीभाषेच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रात तसेच अन्य राज्यांमध्येही केंद्रांची उभारणी करण्यात येईल.
- सांस्कृतिकमंत्रालयाकडून याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत शिक्षण मंत्रालयातर्फे या केंद्रांची उभारणी होईल. उत्तर भारतातही ही केंद्रे असतील.
- भाषेचेप्राचीनत्व सिद्ध करणारे 1500 ते 2000 वर्षांपासूनचे साहित्य, काव्य, ग्रंथसंपदा, शिलालेख आणि अन्य पारंपरिक पुराव्यांच्या आधारे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे.
- मराठीसोबतचपाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभिजात दर्जासाठीचा लढा
- मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने 10 जानेवारी 2012 रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती स्थापन केली होती.
- यासमितीने इतिहास संशोधन करुन जुने संदर्भ, प्राचीन ग्रंथ, पुरातन काळातील ताम्रपट, कोरीव लेख, शिलालेखांचा संदर्भ इ. प्राचीन दस्ताऐवज तपासून त्याआधारे एक सर्वंकष व परिपूर्ण अहवाल शासनास सादर केला.
- याअहवालामध्ये सविस्तर विवेचनासह मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळणेसाठी विहित केलेल्या निकषांची पूर्तता करते हे पुराव्यांसह स्पष्ट केले आहे.
- समितीनेतयार केलेला मराठी भाषेमधील मूळ अहवाल दि.12 जुलै 2013 च्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे पाठविला आहे.
- त्यानंतरसमितीने परिशिष्टांसह सादर केलेला इंग्रजीमधील अहवाल देखील दि. 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्या स्तरावर सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.
- सन2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी अभिजात भाषा आहे, हे दाखवून देण्यासाठी समिती नेमली. दिवंगत प्रा. हरी नरके समितीचे समन्वयक होते. या समितीने मराठीचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे दाखवून दिले.
अभिजात भाषेचे निकष पुढीलप्रमाणे
- त्याभाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
- तीभाषा स्वयंभू असावी.
- प्राचीनभाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा.
- प्राचीनसाहित्य/ग्रंथ त्या भाषेत असावेत, जे वक्त्यांच्या अनेक पिढ्यांद्वारे भाषा-वारसा मानले जाते.
- ज्ञानग्रंथ, विशेषतः गद्य ग्रंथ, कविता, शिलालेख आणि शिलालेख आदी पुराव्यांव्यतिरिक्त त्या भाषेतील अभिजात साहित्य त्याच्या सध्याच्या स्वरूपापेक्षा वेगळे असू शकते किंवा त्यांच्या शाखांच्या नंतरच्या स्वरूपापासून वेगळे असू शकते.
- प्रमुखचार निकष: प्राचीन, श्रेष्ठता, स्वयंभू आणि सलगता
ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
1) तमिळ (2004)
2) संस्कृत (2005)
3) कन्नड (2008)
4) तेलगू (2008)
5) मल्याळम (2013)
6) ओडिया (2014)
2024 :
7) मराठी
8) पाली
9) बंगाली
10) आसामी
11) प्राकृत