जर्मनीला खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून फुटबॉल विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे दिग्गज फुटबॉलपटू फ्रॅंझ बेकनबॉर यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीने 1974 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर ते मार्गदर्शक असताना जर्मनीने अर्जेंटिनाला नमून 1990 मध्ये विश्वचषक जिंकला होता.
अधिक माहिती
● 1966 च्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनी उपविजेता होता. 1970 च्या विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता.
● या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत बेकनबॉर यांचा जर्मनी संघात समावेश होता .
● 1986 च्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनी उपविजेता राहिला होता त्यावेळी ते संघाचे प्रशिक्षक होते.
● फिफा च्या पुरस्कार समितीत बेकनबॉर काही काळ काम केले.
● फुटबॉल विश्वात बेकनबॉर हे ‘डेर कॅसर’ या टोपण नावाने लोकप्रिय होते.
● ते दोन वेळा ‘बॅलेन डी ओर’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते.