महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
- महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेचे 31 वे (व्यक्ती म्हणून 21 वे ) मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसें. रोजी शपथ घेतली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शपथविधी सोहळ्याद्वारे महायुतीने मुंबईतील आझाद मैदानात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
- माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता आणखी काही विक्रमांचीही नोंद झाली आहे.
- देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असून यापूर्वी महाराष्ट्रात हा मान केवळ शरद पवार यांना मिळाला होता.
- शरद पवार हे 1978, 1990, 1993 असे तीनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
- देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला असून, त्यांनी सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळही पूर्ण केला आहे.
- फडणवीस हे 1999 पासून ते आजपर्यंत विधिमंडळात सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
- वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.
- 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 असा फडणवीस यांचा पाच वर्षांचा कालावधी होता.
- मुख्यमंत्रिपदाचा सन 2014, 2019, 2024 या तीन विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.
- महाराष्ट्रात 46 वर्षांत नऊ उपमुख्यमंत्री झाले; परंतु त्यापैकी कुणालाही पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही.
- उपमुख्यमंत्रिपदानंतर मुख्यमंत्री झालेले ते राज्यातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
- याशिवाय 31 ऑक्टोबर 2014 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले होते.
- त्यापूर्वी वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते.
- सर्वांत कमी काळासाठी मुख्यमंत्री बनण्याची नोंदही फडणवीस यांच्या नावावर आहे.
- 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 असे केवळ चार दिवसांसाठी ते मुख्यमंत्री होते.
फडणवीस यांनी भूषवलेली पदे
- 1989 भारतीयजनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
- 1999 तेआजतागायत – विधानसभा सदस्य
- 1992 ते 2001 सलगदोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
- 1994 भारतीयजनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
- 2001 भारतीयजनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
- 2010 भारतीयजनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस
- 2013 भारतीयजनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
- 2014 ते 2019 महाराष्ट्राचेमुख्यमंत्री
- 2019 तेजून 2022 महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते
- जून 2022 ते 25 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्रराज्याचे उपमुख्यमंत्री
आजवर झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
- नासिकरावतिरपुडे
- सुरेंद्रसोळंके
- रामरावआदिक
- गोपीनाथमुंडे
- छगनभुजबळ
- विजयसिंहमोहिते पाटील
- आर. आर. पाटील
- अजितपवार
- देवेंद्रफडणवीस
- एकनाथशिंदे
इस्रोच्या ‘प्रोबा-3′ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ ने 5 डिसें. रोजी युरोपियन अंतराळ संस्थेने (एएसए) हाती घेतलेला सौर प्रयोगातील ‘प्रोबा-3’ मोहिमेचे ‘पीएसएलव्ही-सी59’ रॉकेटवरून यशस्वी प्रक्षेपण केले.
- प्रक्षेपण केल्यानंतर सुमारे 18 मिनिटांनी दोन्ही उपग्रह ‘उजव्या कक्षेत’ सामावले
- प्रोबा-3 (प्रोजेक्ट फॉर ऑनबोर्ड ऑटोनॉमी) मोहिमेमध्ये दुहेरी उपग्रहांचा समावेश आहे.
- यामध्ये दोन अंतराळयान (उपग्रहांच्या आत ठेवलेले) एकत्र उड्डाण करून त्यातील एक अंतरळयान सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे.
- ‘उपग्रह उजव्या कक्षेत ठेवण्यात आले आहेत जे जवळजवळ 600 किलोमीटर ग्रहकक्षेची एक अतिशय उच्च लंबवर्तुळाकार कक्षा आहे.
- ते 61 व्या मोहिमेत (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे) अचूकपणे साध्य झाले आहे.
- तत्पूर्वी, एका समाज माध्यम संदेशात इस्रोने ‘मिशन यशस्वी’, असा उल्लेख इस्रो केला
- प्रोबा हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ हा ‘चलाप्रयत्न करू‘ असा होतो.
- भारताच्या व्यावसायिक अवकाश मोहिमेच्या अनुषंगाने हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो.
प्रोबा 3 मोहीम विषयी:
- सूर्याच्या पृष्ठभागापासून हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेले सूर्याचे वातावरण (सोलार कोरोना) हे कायमच खगोल शास्त्रज्ञांसाठी कोडे राहिले आहे.
- सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सिअस असताना कोरोनाचे तापमान मात्र सुमारे 15 ते 20 लाख अंश सेल्सिअस असते.
- याच कोरोनामध्ये सौरज्वाळा, सौरवादळे यांसारख्या घटना घडत असतात.
- सूर्याच्या प्रखरतेमुळे सोलार कोरोनाचे निरीक्षण नैसर्गिकरित्या खग्रास सूर्यग्रहणामध्ये करता येते.
- युरोपच्या शास्त्रज्ञांनी मात्र, दोन उपग्रहांच्या माध्यमातून अवकाशात कृत्रिम खग्रास सूर्यग्रहण तयार करून सूर्याच्या कोरोनाचे दीर्घकाळ निरीक्षण करण्यासाठी प्रोबा 3 मोहीम आखली आहे.
- या आधीही अमेरिकी अवकाश संशोधन संस्था – नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईसा) संयुक्त विद्यमाने ‘सोहो’ या मोहिमेतून कृत्रिम सूर्यग्रहणाचा प्रयोग करण्यात आला होता. युरोपमधील स्पेन, बेल्जियम, पोलंड, इटली आणि स्वित्झर्लंड आदी देशांनी एकत्रितरित्या ही अत्याधुनिक सौरमोहीम विकसित केली आहे.
सुनीतीकुमार पाठक यांचे निधन
- राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि बौद्ध अभ्यासाचे प्रसिद्ध अभ्यासक सुनीतीकुमार पाठक यांचे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर-शांतिनिकेतन येथील राहत्या घरी निधन झाले.
- ते 101 वर्षांचे होते.
- पाठक हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या इंडो-तिबेटीयन अभ्यास विभागाशी संबंधित होते.
- 1972 ते 1986 या काळात त्यांनी विद्यापीठाचे डीन म्हणूनही काम केले.
- त्यांनी कलकत्ता विद्यापीठातील बौद्ध अभ्यास विभागात भारत तसेच परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये बौद्ध आणि इंडो-तिबेटी अभ्यासासाठी ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ म्हणून काम केले.
- पाठक यांनी सुमारे 200 पुस्तके लिहिली आहेत.