- जपान येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन सर्जेराव खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील एफ-46 गटात आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
- या स्पर्धेत भारताने 22 मे पर्यंत 5 सुवर्णपदकांसह 12 पदकांची लयलूट केली आहे.
- भारताची जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
- यापूर्वी भारताने 2023 मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके जिंकली होती.
- सचिनने30 मीटर लांब गोळाफेक करत सुवर्णपदकाची कमाई केली.
- यासह त्याने आपलाच21 मीटरचा आशियाई विक्रमही मोडीत काढला.
- तसेच आता त्याने पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.
- सचिन हा सांगली जिल्ह्यातील करगणी गावचा असून, त्याचा शालेय जीवनात अपघात झाला, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले.
- गँगरीनमुळे सचिनने कोपराचे स्नायू गमावले आणि अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात बरा झाला नाही. मात्र, गोळाफेकीत एफ-46 गटात त्याने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.