एस्सार समूहाचे सह–संस्थापक शशी रुईया यांचे निधन
- पहिल्या पिढीचे उद्योजक आणि छोटेखानी बांधकाम व्यवसायाला पायाभूत सुविधा क्षेत्रातील एस्सार समूहात रूपांतरित करणारे शशिकांत रुईया यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
- वडील नंदकिशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली कारकीर्दीची सुरुवात करून, शशी आणि त्यांचा भाऊ रवी यांनी 1969 मध्ये एस्सारची पायाभरणी केली.
अँजेला मर्केल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
- जर्मनच्या माजी चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्या ‘फ्रिडम’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
- या पुस्तकात मर्केल यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील घडामोडींचा आढावा घेतला असून या काळातील जागतिक नेत्यांबरोबरील काही कटू-गोड आठवणीही शब्दबद्ध केल्या आहेत.
- या पुस्तकात त्यांनी – ब्रेक्झिटबाबतच्या निर्णयाबद्दलही त्यांची मते सविस्तरपणे मांडली आहेत.
पहिले प्लास्टिक पुनर्वापर प्रदर्शन मुंबईत होणार
- देशातील पहिले वहिले प्लॅस्टिक रिसायकलिंग – तंत्रज्ञान प्रदर्शन; तसेच पर्यावरणपूरक पॉलिथिन आणि फोम प्रदर्शन (प्लॅस्टिक – रिसायकलिंग शो) मुंबईतील गोरेगावच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये 4 ते 6 – डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात – आले आहे.
- सध्या देशातील पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकची बाजारपेठ एक कोटी टनांची – आहे. ती 2032 मध्ये सव्वादोन कोटी – टनांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
- देशात दरवर्षी जेमतेम दीड लाख टन प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची क्षमता असून, त्यात वाढीची मोठी संधी आहे, त्यासाठी या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपायोजना याची माहिती या प्रदर्शनात मिळेल.
- मीडिया फ्युजन व क्रेन कम्युनिकेशन तर्फ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे
महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक चे सहाय्य
- एशियन डेव्हलपमेंट बँक ने महाराष्ट्रात दर्जेदार आणि परवडणारी तृतीय श्रेणी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश सुधारण्यासाठी 500 दशलक्ष यूएस डॉलर कर्जाचे पॅकेज वचनबद्ध केले आहे.
- हे पॅकेज भारतातील राज्याच्या नेतृत्वाखालील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण केंद्रे स्थापन करण्यात मदत करेल.
- हे पॅकेज चार वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मदत करेल ज्यामध्ये हवामान आणि आपत्ती- प्रतिरोधक, लिंग-प्रतिसादात्मक आणि सामाजिकदृष्ट्या समावेशक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
- हे पॅकेज लोकांचा खिशाबाहेरील खर्च कमी करेल आणि दर्जेदार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती आणि कायम ठेवण्यासाठी धोरणात्मक कृती तयार करेल.
आसाम मधील जिल्ह्याचे नाव बदलले
- आसाममधील होजाई जिल्ह्याच्या मुख्यालयाचे नाव आता श्रीमंत शंकरदेवनगर असे करण्यात आले आहे.
- मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा ही माहिती दिली.राज्य मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतला
करीमगंज आता श्रीभूमी म्हणून ओळखले जाणारे
- आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने ‘करीमगंज’ जिल्ह्याचेही नाव बदलण्याची घोषणा केली आहे.
- हे शहर आता ‘श्रीभूमी’ या नावाने ओळखले जाणार आहे.
- ‘श्रीभूमी’ हे नाव बदलल्याने आसामच्या विविधतेशी आणि इतिहासाशी जुळणाऱ्या जिल्ह्याच्या ओळखीला नवा आणि सांस्कृतिक संदर्भ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- त्यांनी या निर्णयाचे वर्णन आसामचा सांस्कृतिक वारसा मजबूत करणारा असे केले.



