● राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त (5 सप्टेंबर) महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सण 2023 साठीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● प्रत्येकी 50 हजार रुपये रोख आणि सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
● महाराष्ट्रातील पाच शिक्षकांमध्ये आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव माळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे, व्हीजेटीआय (मुंबई) केशव काशिनाथ सांगळे, आयआयटी मुंबईचे डॉक्टर राघवन बी सुनोज, मुंबईतील गव्हर्मेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या स्वाती देशमुख, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉक्टर चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांचा समावेश आहे.


