Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्रात इथेनॉलचे 244 कोटी लिटर उत्पादन (PRODUCTION OF 244 CRORE LITERS OF ETHANOL IN MAHARASHTRA)

  • Home
  • Current Affairs
  • महाराष्ट्रात इथेनॉलचे 244 कोटी लिटर उत्पादन (PRODUCTION OF 244 CRORE LITERS OF ETHANOL IN MAHARASHTRA)
  • महाराष्ट्रातील इथेनॉल प्रकल्पांनी यावर्षी एकूण 244 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे.
  • इथेनॉल निर्मितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 18 कोटी लिटरने वाढ झाली आहे.
  • गेल्या वर्षी राज्यात 226 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती.
  • यावर्षी ऊस गळीत हंगामात राज्यातील साखर उत्पादन कमी होऊन इथेनॉल उत्पादनात भरीव वाढ झाली आहे.
  • चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांनी मिळून एकूण 16 लाख टन साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वर्ग केली आहे.
  • यामुळेच यावर्षी इथेनॉलचे विक्रमी उत्पादन झाले आहे.
  • पूर्वी साखर कारखान्यांमध्ये फक्त साखरेचेच उत्पादन होत होते आता साखर कारखान्यांमधून वीज, आसवानी, इथेनॉल, बायोगॅस इत्यादी प्रमुख उपपदार्थांसह सुमारे 35 उपपदार्थांची निर्मिती करणे शक्य झाले आहे.
  • साखर कारखाने आता इंधन निर्मितीचे कारखाने होऊ लागले आहेत.
  • कापूस, सोयाबीन नंतर ऊस हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक झाले आहे

राज्यातील इथेनॉल निर्मिती दृष्टिक्षेपात:

  • राज्यातील एकूण इथेनॉल निर्मिती प्रकल्प : 163
  • सहकारी साखर कारखान्याचे प्रकल्प: 54
  • खाजगी साखर कारखान्याचे प्रकल्प: 71
  • स्वतंत्र प्रकल्प: 38
  • प्रकल्पासाठी गुंतवणूक: 21,371 कोटी

तीन वर्षातील इथेनॉलची मागणी व पुरवठा:

 वर्ष                 मागणी               पुरवठा 

2020-2021     108 कोटी लि.    97 कोटी लि.

 2021-2022    120 कोटी लि.   102 कोटी लि.

 2022-2023    132.32को.लि.   48.11को.लि.

—————————————————-

एकूण मागणी  360.32को.लि.  247.11को.लि.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *