Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा

तरुण पिढीला रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाकडे वळविणे अतिशय महत्त्वाचे आहे ही बाब विचारात घेऊन 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीतर्फे ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची’ अंमलबजावणी केली जाणार आहे. याद्वारे महाराष्ट्रातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत.

अधिक माहिती
• या कौशल्य विकास केंद्राद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना असेल आणि हे अभ्यासक्रम नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेम वर्कशी सुसंगत असतील .त्यासाठी केंद्र शासनातर्फे निश्चित केलेला कॉम कॉस्ट नॉर्मस् नुसार प्रशिक्षण शुल्क देण्यात येणार आहे.
• कौशल्य विकास केंद्रा मार्फत गावातील नागरिकांना रोजगार कमावण्याची व नवी कौशल्य शिकण्याच्या समान संधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
• जेणेकरून रोजगारासाठी गावाहून शहराकडे होणारे स्थलांतर कमी होईल.
• त्याचप्रमाणे नवीन वर्षात सुरू होणाऱ्या शंभर कौशल्य विकास केंद्रामुळे महाराष्ट्राची कौशल्य संपन्न पिढी अधिक जलद गतीने तयार होणार आहे.
• मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात प्रथमच एकाच वेळी महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *