कृषीमाल साठवणुकीची क्षमता वृद्धी करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाने ‘गाव तेथे गोदाम’ उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी पणन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
अधिक माहिती
● कृषीमालाची मूल्यवृद्धी करणे, छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, गोदाम क्षेत्रात खासगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्यात ‘गाव तेथे गोदाम’ बांधण्यात येणार आहेत.
● त्यासाठी राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना अहवाल बनवला आहे.
● या अहवालावर योजनेचे प्रारूप बनवण्यात येणार आहे.