Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्रात रोझी पीपिट चे दर्शन Rosy Pipit sighting in Maharashtra

 महाराष्ट्रात रोझी पीपिट चे दर्शन

 

  • नाशिक जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ‘रोझी पिपिट’ हा पक्षी आढळून आला.
  • महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला हा पक्षी याआधी डिसेंबर 2016 मध्ये विदर्भातील अकोल्यात आढळल्याची नोंद आहे.
  • हिमालय आणि ईशान्य भारतात आढळणारे हे पक्षी हिवाळ्यात उत्तराखंड, राजस्थान आणि आसाममध्ये जातात. महाराष्ट्रात ते येत नाहीत.

मराठीतगुलाबी तीरचिमणी‘?

  • विणीच्या काळात हा पक्षी गुलाबी दिसतो. या पक्ष्याला मराठी भाषेत नाव नसल्याने त्याचे ‘गुलाबी तीरचिमणी’ असे नामकरण करण्यासाठी पक्षी अभ्यासकांचे प्रयत्न सुरू आहेत.

कुठे आढळतात ?

  • रोझी पिपिट ही मोटासिलिडे कुटुंबातील पक्ष्यांची एक प्रजाती आहे.
  • हे पक्षी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, भारत, दक्षिण कोरिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंडमध्ये आढळतात.
  • अफगाणिस्तान आणि दक्षिण कोरियात मूळ वास्तव्य असलेल्या रोझी पिपिटची वीण चीनमध्ये होते. हिवाळ्यात तो स्थलांतर करून हिमालय आणि आसाममध्ये येतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *