माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांची महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनीच्या तज्ञ संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पडसलगीकर यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी राहणार आहे.
दत्तात्रय पडसलगीकर
● पडसलगीकर भारतीय पोलीस सेवेतील 1982 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.
● नागपूर, कराड, नाशिक मध्ये त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते.
● धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात ते पोलीस अधीक्षक होते. ते मुंबई पोलीस आयुक्त देखील होते.
● मुंबई पोलीस आयुक्तपद भूषविल्यानंतर पडसलगीकर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
● मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पडसलगीकर यांचा सहभाग होता.
● ऑक्टोबर 2019 मध्ये पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
● मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आला.
● सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयचे तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पडसलगीकर यांच्याकडे सोपवली होती.
● केंद्रीय गुप्तचर यंत्रणेत पडसलगीकर नियुक्तीस होते.
दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तवार्ता प्रबोधिनीची स्थापना
● मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यानंतर 2009 मध्ये महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली.
● प्रबोधिनीची स्थापना होण्यापूर्वी पुणे येथील कोंढवा भागातील वडाची वाडी येथे विशेष सुरक्षा प्रशिक्षण केंद्र होते.
● मुंबईतील दादर येथे विशेष शाखा प्रशिक्षण केंद्र होते.
● या दोन्ही संस्थांचे एकत्रीकरण करून महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली.
● राज्य गुप्त वार्ता विभागात (एसआयटी) निवडल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.
● पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, घातपात विरोधी तपासणी, दहशतवादी कारवायाबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.