महिलांमधील मासिक पाळी विषयी आजही खुलेपणाने बोलले जात नाही त्यामुळे स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होतात हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भाडपुरा तालुक्यातील बोरिया गावात प्राथमिक शिक्षकाने मासिक पाळीतील स्वच्छते विषयी जागृती निर्माण करण्यासाठी आपल्या शाळेत किशोरवयीन मुले व गावातील महिलांसाठी ‘पॅड बँक’ सुरू केली आहे. राखी गंगावर असे या शिक्षिकेचे नाव आहे. 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय मातृदिनाच्या निमित्ताने ही पॅड बँक सुरू करण्यात आली होती. ‘ हमारी किशोरी- हमारी शक्ती’ या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्राथमिक शाळेत मुलींच्या माता तसेच गावातील इतर महिलांना बोलून स्वखर्चातून सॅनिटरी पॅड विकत घेऊन महिलांना देण्यात येते. या उपक्रमाला तीन महिने होत असून उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे.


