भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या स्थानापर्यंत नेणाऱ्या प्रशिक्षक यान्नेक शॉपमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शॉपमन यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ या वर्षी ऑगस्टमध्ये संपणार होता. शॉपमन यांनी 2021 मध्ये शोर्द मरीन यांच्याकडून भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले. मात्र, या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात भारतीय संघ अपयशी ठरला.


