Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

माजा फिरकिपट्टू पद्माकर शिवलकर यांचे निधन

माजा फिरकिपट्टू पद्माकर शिवलकर यांचे निधन

 

  • देशातील सर्वोत्तम डावखुरा फिरकी गोलंदाजांपैकी एक पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी मुंबईत वृद्धपकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
  • क्रिकेट विश्वातील 1960 ते 1970च्या दशकांत जेव्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा दबदबा होता, त्या काळातील शिवलकर हे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज होते.
  • क्रिकेट विश्वात ते ‘पॅडी’ या टोपणनावाने परिचीत होते.
  • भारतीय संघातून खेळताना बिशनसिंग बेदी क्रिकेटची मैदाने गाजवत असतानाच शिवलकर हे स्थानिक क्रिकेटमध्ये आपला दरारा राखून होते.
  • वयाच्या 21 व्या वर्षी 1961-62 मध्ये रणजी पदार्पण केले.
  • कारकीर्दीत 124 प्रथम श्रेणी सामने खेळताना त्यांनी 589 गडी बाद केले.
  • यात 42 वेळा 5, तर 13 वेळा त्यांनी 10 गडी बाद केले.
  • दुर्दैवाने त्यांची गुणवत्ता मात्र केवळ देशांतर्गत क्रिकेटपुरती मर्यादित राहिली. ते कधीही भारताकडून खेळू शकले नाहीत.
  • मुंबईने 1972-73 मध्ये पंधरावे रणजी विजेतेपद मिळवले, तेव्हा शिवलकर यांची कामगिरी महत्त्वाची ठरली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *