- व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी निकोलस मादुरो हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
- अध्यक्षपदासाठी 28 जुलै रोजी मतदान झाले होते. 29 जुलै रोजी निकाल जाहीर झाला.
- व्हेनेझुएलाच्या ‘नॅशनल इलेक्ट्रॉल कौन्सिल’ने मादुरो हे 51 टक्के मत मिळवून विजयी झाल्याचे घोषित केले.
- प्रमुख विरोधक एडमुंडो गोंझालेझ यांना 44 टक्के मते मिळाली.
- निकोलस मदुरो मोरोस हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आहेत. व्हेनेझुएलाचे लोकप्रिय नेते हुगो चावेझ यांचे राजकिय वारसदार मानले जातात.
- हुगो चावेझ यांच्या सरकारमध्ये ते उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री होते.
- चावेझ यांच्या निधनानंतर मार्च 2013 मध्ये ते काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले.
- त्यानंतर झालेल्या फेरनिवडणुकांमध्ये 14 एप्रिल 2013 रोजी निर्वाचन आयोगाने त्यांना विजयी घोषित केले.
- मादुरो हे ‘युनायटेड सोशालिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएला’ या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात.