Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय जाजू यांनी स्वीकारला पदभार

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय जाजू यांनी आज पदभार स्वीकारला. ते तेलंगणा केडरचे 1992 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर, मावळते माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि मंत्रालयातील इतर अधिकारी आणि विविध माध्यम घटकांनी त्यांचे स्वागत केले.

अधिक माहिती
● अपूर्व चंद्रा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
● संजय जाजू यांनी यापूर्वी 2018 ते 2023 पर्यंत भारत सरकारचे अतिरिक्त सचिव आणि ऑक्टोबर 2014 ते मार्च 2018 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादीतचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.
● मे 2011 ते ऑक्टोबर 2014 पर्यंत ते आंध्र प्रदेश सरकारचे सचिव (इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभाग) म्हणून कार्यरत होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *