● तमिळनाडूमधील 21 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना (ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग) तांदूळ आणि साखरेसह रेशनच्या इतर वस्तू घरपोच पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी एक योजना सुरू केली आहे, या योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री तायूमनावर योजना’ असे आहे.
● या योजनेचा लाभ 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग रेशन कार्डधारक यांना मिळणार आहे.
● परिणामी, तमिळनाडूतील 20.42 लाख ज्येष्ठ नागरिक आणि 1.27लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
● या उपक्रमाचा एक भाग म्हणून दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी लाभार्थ्यांना या वस्तू घरपोच पोहचविल्या जातील.
● दरम्यान, लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या असून, त्या संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
● हे कर्मचारी पात्र लाभार्थ्यांना वस्तू पोहोचवतील.
● या उपक्रमाचा भाग म्हणून या कर्मचाऱ्यांनाना इलेक्ट्रॉनिक वजन यंत्र आणि ई-पीओएस (पॉइंट ऑफ सेल) यंत्र प्रदान केले जाईल.
● या योजनेसाठी सरकारला 30.16 कोटी रुपये खर्च येणार असून, समाजातील उपेक्षित घटकांना लाभ मिळवून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.