Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाची घोषणा Chief Minister’s Panchayat Raj Campaign Announcement

Chief Minister's Panchayat Raj Campaign Announcement

● ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
● या अभियानाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना विविध गटात दरवर्षी 290 कोटी 33 लाख रुपयांची एक हजार 902 बक्षीसे देण्यात येणार आहेत.
● सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची सांगड, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व
● श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे यावर्षीच्या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे.
● अभियानात विविध स्तर आणि गटात 1902 पुरस्कार दिले जाणार असून अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असा राहणार आहे.
● ग्रामपंचायतसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाला पाच कोटी रुपये द्वितीय क्रमांक तीन कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
● अभियानाच्या अंमलबजावणी व संयंत्रणासाठी राज्यस्तरावर ग्रामविकास व पंचायत राजमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *