Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड (Gyanesh Kumar New Election Commissioner)

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड

 

  • ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.
  • सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली. त्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाकडून याबाबतचा शासन निर्णय 17 फेब्रुवारी रोजी काढला.
  • ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे.
  • देशाचे 26 वे निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार या वर्षाच्या शेवटी बिहार विधानसभा निवडणूक आणि 2026 साली केरळ आणि पद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांवर देखरेख ठेवतील.
  • याचवर्षी तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत.

ज्ञानेश कुमार

  • 1988 च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या ज्ञानेश कुमार यांचा जन्म 27 जानेवारी 1964 रोजी उत्तर प्रदेशच्या आगरा येथे झाला.
  • वाराणसीच्या क्विन्स महाविद्यालय आणि लखनऊच्या काल्विन तालुकेदार महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले.
  • त्यानंतर आयआयटी कानपूर मधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले.
  • आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर ते केरळच्या एर्नाकुलममध्ये ते सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.
  • यानंतर त्यांनी केरळमध्ये विविध पदांवर काम केले.
  • राम मंदिर निर्माण समितीवर काम केले
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात ज्ञानेश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • त्यावेळी ज्ञानेश कुमार गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. तसेच अयोध्येतील राम मंदिर निर्माण समितीचेही ते सदस्य होते. तसेच राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या बाल रुपातील मूर्तीची निवड करण्याच्या मंडळातही त्यांचा समावेश होता
  • ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्ताचीही निवड करण्यात आली आहे.
  • 1989 च्या बॅचचे हरियाणा केडर डॉ. विवेक जोशी हे आता निवडणूक आयुक्त असतील.
  • निवडणूक आयुक्त हा पुढे जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त होतो, असा प्रघात राहिला आहे. ज्ञानेश कुमार हेदेखील राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहत होते.
  • भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे.
  • संविधानाने कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली.
  • आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते.
  • भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.
  • निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो.
  • ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते).
  • तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.
  • भारतीय निवडणूक आयोग ही राष्ट्रीय , राज्य विधानसभा , राज्य विधान परिषदा आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयांच्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी घटनात्मकदृष्ट्या सक्षम संस्था आहे
  • स्थापना : 25जानेवारी 1950
  • मुख्यालय : निर्वचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *