मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंडळाचे अध्यक्षपदी डॉक्टर श्यामसुद्दीन तांबोळी यांची निवड झाली. तांबोळी हे गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळापासून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते आहेत तसेच ते मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक आहेत.
• हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली इंडियन सेक्युलर सोसायटी आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाने महाराष्ट्र मुस्लिम शिक्षण परिषद आयोजित केली होती. या घटनेस पन्नास वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन होणार आहे.
• मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील प्रबोधनासाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने मार्च 22, 19970 रोजी पुण्यात स्थापन झाली.


