● जगातील सर्वात वयस्कर धावपटू फौजा सिंग यांचे जालंधर येथील रस्ते अपघातात निधन झाले. ते ११४ वर्षांचे होते.
● फौजा सिंग यांचे जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने धडक दिल्यामुळे निधन झाले.
● फौजा सिंग यांचा जन्म १ एप्रिल १९११ मध्ये जालंधर येथील ब्यास पिंड या गावामध्ये झाला.
● त्यांना ‘टरबन टोरनॅडो’ (पगडीधारी वादळ) या नावाने ओळखले जात होते.
● फौजा सिंग यांनी ८९व्या वर्षी पहिल्यांदाच स्पर्धात्मक शर्यतीत सहभाग घेतला.
● २००० मध्ये लंडन येथे त्यांनी पहिली मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली.
● फौजा सिंग यांनी लंडन, टोरंटो, न्यूयॉर्क, मुंबई या शहरांमध्ये नऊ मॅरेथॉन शर्यती पूर्ण केल्या.
● २००३ मध्ये टोरंटो येथे झालेली मॅरेथॉन शर्यत त्यांनी पाच तास, ४० मिनिटे व चार सेकंदांत पूर्ण केली.
● ९० वर्षांवरील वयोगटात त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन केले हे विशेष.
● २०११ मध्ये त्यांनी टोरंटो येथील मॅरेथॉन पूर्ण करताना विक्रमावर मोहर उमटवली.
● १००व्या वर्षी मॅरेथॉन पूर्ण करणारे ते जगातील पहिलेच व्यक्ती ठरले.
● ही मॅरेथॉन त्यांनी आठ तासांमध्ये पूर्ण केली.
● फौजा सिंग यांनी लंडन ऑलिंपिकमध्ये मशाल हातामध्ये घेऊन धावण्याचा मानही मिळवला होता.
● त्यांनी २०१३ मध्ये हाँगकाँग व चीन येथील शर्यतीत सहभाग घेतला.
● त्यानंतर स्पर्धात्मक शर्यतीमधून त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
● फौजा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘टरबन टोरनॅडो’ (पगडीधारी वादळ) हे पुस्तक २०११ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते.