रशिया ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत आधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन सुरू करण्यास तयार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गई यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली.
ठळक बाबी
• रशिया आणि भारत यांच्यात आधुनिक शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनासह लष्करी – तांत्रिक सहकार्याबद्दल चर्चा करण्यात आली.
• भारत- रशिया संबंधात भु- राजकीय वास्तव धोरणात्मक साधर्म्य आणि परस्परांच्या लाभ प्रतिबिंबित होतो.
• रशियाची राजधानी मास्को येथे लावरोव्ह यांची भेट घेऊन जयशंकर यांनी त्यांच्याशी विविध विषयावर तपशीलावर दीर्घ चर्चा केली.
• उभय देशातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्यातील प्रगती, ऊर्जा- इंधन व्यापार संपर्क व्यवस्था प्रभावी करण्याचे प्रयत्न करणे, लष्करी तंत्रज्ञान सहकार्य, दोन्ही देशांच्या नागरिकांतील सहकार्याचे – सौहार्दाचे संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यूएनएसीच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा
• संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या(यूएनएसीच्या) कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या भारताच्या आकांक्षाला रशियाने पाठिंबा दिला.
• तसेच जी-20 शिखर बैठकीत वादग्रस्त मुद्यांची भारताने कुशलतेने हाताळणी केल्याबद्दल प्रशंसाही केली.
• सुरक्षा परिषदेत ब्रिटन, चीन, रशिया, अमेरिका आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी सदस्य आहेत.
• भारत दिर्घकाळापासून स्थायी सदस्यत्वाची मागणी करत आहे.