Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मेस्सी, फ्रेझर -प्राइस प्रतिष्ठेच्या ‘लॉरियस’ पुरस्काराने सन्मानित

  • Home
  • Current Affairs
  • मेस्सी, फ्रेझर -प्राइस प्रतिष्ठेच्या ‘लॉरियस’ पुरस्काराने सन्मानित

● अर्जेंटिना आणि पॅरिस सेंट जर्मन चा आघाडीपटू लेओनेल मेस्सीने लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारांमधील वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

● जमैकाची धावपटू शेली अँन फ्रेझर – प्राइस महिला विभागात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराची मानकरी ठरली.

● मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने 2022 मध्ये फिफा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते .

● मेस्सीने उत्कृष्ट कामगिरी करताना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणारा गोल्डन बॉल पुरस्कार पटकावला होता. त्याने या स्पर्धेत 7 गोल केले होते.

● मेस्सीला दुसऱ्यांदा लॉरियस वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

● यापूर्वी 2020 मध्ये फॉर्मुला-1 स्पर्धेतील चालक लुईस हॅमिल्टन याच्यासह मेस्सीला संयुक्तरीत्या हा पुरस्कार मिळाला होता.

● जमैकाच्या फ्रेझर- प्राइसने मागच्या वर्षी जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक स्पर्धेत प्रतिष्ठेच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते.तिच्या नावावर 3 ऑलिंपिक आणि 10 जागतिक सुवर्ण पदके आहेत.

सर्वाधिक वेळा लॉरियस पुरस्कार रॉजर फेडररच्या नावे:

● क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा लॉरियस पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकण्याचा मान स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या नावे आहे.

● त्याने तब्बल सहा वेळा हा पुरस्कार जिंकला आहे .( पाच वेळा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर म्हणून तर एक वेळा कमबॅक ऑफ द इयर)

● महिलांमध्ये हा पुरस्कार जिंकण्यात सेरेना विल्यम्स आघाडीवर आहे सेरेना विल्यम्सने पाच वेळा हा पुरस्कार आपल्या नावे केला (चार वेळा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून तर एक वेळा कमबॅक ऑफ द इयर)

लॉरियस पुरस्कार:

● लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स हा वार्षिक पुरस्कार सोहळा आहे ज्यामध्ये क्रीडा जगतातील व्यक्ती आणि संघांना वर्षभरातील क्रीडा कामगिरीसह सन्मानित केले जाते

● लॉरियस स्पोर्ट्स फॉर गुड फाउंडेशनचे संस्थापक डेमलर आणि रिचेमॉँट यांनी 1999 या वर्षी पुरस्काराची स्थापना केली.

● 2000 या वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येतो.

● ऍथलेटिक्समधील विजयाची पारंपरिक प्रतीक मानले जाणाऱ्या लॉरेलच्या ग्रीक शब्दापासून लॉरियस हे नाव आले आहे.

● 2020 या वर्षी लॉरियस स्पोर्टिंग मोमेंट अवॉर्ड म्हणून भारताच्या सचिन तेंडुलकरला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *