फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याची पुरुष विभागातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या दरम्यान केलेल्या कामगिरीकडे लक्ष ठेवून फिफाकडून पुरस्कार देण्यात आले.
अधिक माहिती
● या दरम्यान, लिओनेल नेतृत्वात अर्जेंटिनाने विश्वकरंडक पटकावला.
● महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार एताना बोनमाती या स्पेनच्या खेळाडूने पटकावला.
पेप गॉर्डियोला सर्वोत्तम प्रशिक्षक
● मँचेस्टर सिटीचे पेप गॉर्डियोला ‘फिफा’च्या सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.
● त्यांना 2011 सालानंतर प्रथमच हा पुरस्कार मिळाला.
● महिलांमध्ये इंग्लंडच्या सरिना विगमन यांनी पुरस्कार पटकावला.
● मँचेस्टर सिटीच्या एडर्सनला सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला.