- भुवनेश्वर मोहन चरण माझी यांची ओडिशाची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची घोषणा केली.
- कनक वर्धन सिंहदेव व प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील.
- ओडिशात पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाले आहे. राज्यातील 147 पैकी 78 जागा जिंकल्या.
- आदिवासी समुदायातून आलेले माझी हे केओंझार मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
- आतापर्यंत चार वेळा आमदार झालेले मोहनचरण माझी भाजपमध्ये आदिवासी नेते म्हणून ओळखलेले जातात.
- 53 वर्षीय माझी यांनी सरपंच म्हणून 1997 मध्ये राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
- त्यानंतर 2000 ते 2009 या काळामध्ये ते केओंझारचे आमदार होते.
- या काळामध्ये त्यांनी प्रतोद म्हणून काम केले; तसेच आदिवासी आघाडीमध्येही विविध पदांवर काम केले.
- ते 2019 मध्ये पुन्हा केओंझारमधून निवडून आले.
पहिल्यांदा आमदार आणि उपमुख्यमंत्रीही
- प्रवती परिदा यांनी 2024 मध्ये पहिल्यांदा विजय मिळवला. पहिल्यांदा आमदार होतानाच, आता उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांना संधी मिळाली आहे. त्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षाही होत्या.
- बालंगीर राजघराण्यातील के. व्ही. सिंह देवही उपमुख्यमंत्री होणार आहेत.