यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे दर वर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यंदा डॉ. सौम्या स्वामिनाथन यांना जाहीर झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ असणाऱ्या स्वामिनाथन यांना वैद्यकीय क्षेत्रातील अलौकिक, अतुलनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मानपत्र व रोख रक्कम पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अधिक माहिती
• राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.
• या वर्षाच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविषयी प्राप्त झालेल्या शिफारशींचा विचार करून ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने डॉक्टर सोम्या स्वामीनाथन यांची 2023 च्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
• यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 12 मार्च रोजी हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित कार्यक्रमात केंद्राचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.