Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

युन येओल यांच्या विरोधात महाभियोग मंजूर

युन येओल  यांच्या विरोधात महाभियोग मंजूर

युन येओल  यांच्या विरोधात महाभियोग मंजूर

  • दक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल असेंब्ली’ या सर्वोच्च कायदेमंडळात  अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव मंजूर झाला.
  • पार्लमेंटच्या निर्णयानंतर यून येओल आपल्याविरोधातील यांनी निर्णयाला कॉन्स्टिट्युशनल कोर्टात आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
  • दरम्यान, त्यांच्याविरोधात महाभियोग मंजूर झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी सेऊलच्या रस्त्यांवर उतरून जल्लोष साजरा केला.
  • ‘नॅशनल असेंब्ली’त 204 विरुद्ध 85 अशा बहुमताने महाभियोग ठराव मंजूर झाल्यानंतर, यून येओल यांचे सर्व अधिकार आणि कर्तव्ये स्थगित झाले आहेत.
  • त्यांचे अधिकार व कर्तव्ये आता ते सत्तारचनेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंतप्रधान हान डक-सू यांच्याकडे देण्यात आले आहेत.
  • यून येओल यांनी 3 डिसेंबरला अचानक मार्शल लॉ लागू करत देशात आणीबाणी लागू केली होती.
  • मात्र त्यानंतर काहीच तासाने नॅशनल असेंबलीने मार्शल लॉ विरोधात मतदान केल्याने युन यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. त्या विरोधात पहिल्यांदा 7 डिसेंबरला युन यांच्या विरोधात महाभियोगाचा ठराव मांडण्यात आला होता त्यावेळी युन यांच्या पीपल पावर पार्टीच्या बहुसंख्य सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता मात्र नागरिकांमध्ये युन यांच्या विरोधातील रोष आणि संताप विचारात घेऊन तसेच त्यांच्या विरोधात केली जाणारी निदर्शने पाहता पीपीपीच्या सदस्यांनी दुसऱ्यांदा मांडल्या जाणाऱ्या महाभियोगावर मतदानामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
  • युन यांना अध्यक्षपदावरून बडतर्फ करायचे की त्यांना ते पुन्हा बहाल करायचे यावर कॉन्स्टिट्यूशनल कोर्टाने 180 दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे त्यावेळी त्यांच्या विरोधात निकाल लागल्यास त्यांचा वारसदार निवडण्यासाठी 60 दिवसांच्या आत राष्ट्रीय निवडणूक घेणे बंधनकारक असेल

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *