महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने यापुढे दरवर्षी महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाणार आहे. पहिल्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात उद्योग उभारणीसाठी आणि गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक विधान परिषदेत मांडण्यात आले होते. उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. देशात मानाचा व प्रतिष्ठेचा ठरेल असा हा पुरस्कार असेल.
रतन नवल टाटा:
जन्म: 28 डिसेंबर 1937
- रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत.
- 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते.
- रतन टाटा हे पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत.



