- गुप्तचर क्षेत्रात दमदार कामगिरीमुळे दबदबा निर्माण केलेले जेष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची रिसर्च ऍनालिसिस विंग चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- शेजारी देशांसोबतच्या घडामोडींचे सिन्हा हे तज्ञ समजले जातात.
- रॉ भारताची देशाबाहेर काम करणारी गुप्तचर संस्था आहे .
- ‘रॉ ‘चे विद्यमान प्रमुख सामंत गोयल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी पूर्ण होत असून त्यानंतर सिन्हा या पदाचे सूत्र स्वीकारतील.
- भारतीय पोलीस सेवेतील छत्तीसगडच्या 1988 च्या बॅचचे अधिकारी असलेले 59 वर्षे सिन्हा यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शिक्कामोर्तब केले असून त्यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
- रॉ मध्ये मागील दोन दशकावून अधिक काळ काम करत असलेले सिन्हा सध्या या संस्थेत दुसऱ्या क्रमांकाचे कमांडर आहेत
- रॉ चे प्रमुख होण्याआधी ते ऑपरेशन्स विंगचे प्रमुख होते
- या आधी 2019 मध्ये दोन वर्षांसाठी रॉ प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले सामंत गोयल हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत.
RAW : Research Analysis Wing ही भारताची विदेशी गुप्तचर संस्था आहे . एजन्सीचे प्राथमिक कार्य विदेशी गुप्तचर माहिती गोळा करणे , दहशतवादविरोधी भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे आणि भारताच्या परकीय धोरणात्मक हितसंबंधांना पुढे नेणे हे आहे. भारताच्या आण्विक कार्यक्रमाच्या सुरक्षेतही त्याचा सहभाग आहे.
स्थापना:- 21 सप्टेंबर 1968
मुख्यालय:- नवी दिल्ली
बोधवाक्य:- धर्मो रक्षित:
प्रमुख :- सामंत गोयल
Raw चे पहिले प्रमुख :- रामेश्वरनाथ काव


