● महाराष्ट्रात रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे एक अभियान आहे.
● या अभियानांतर्गत, लोकांना वाहतूक नियम पाळण्यास, सुरक्षितपणे वाहन चालवण्यास आणि रस्त्यावरील धोक्यांपासून बचाव करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
● रस्ता सुरक्षेसंदर्भात व्यापक जनजागृती करण्यासाठी राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हे अभियान राबवण्यात येणार आहे.
● केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, युवक आणि क्रीडा मंत्रालय यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार असून, 15 ऑगस्टपासून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
● रस्ते अपघात ही देशातील मोठी समस्या आहे. २०२२ मध्ये देशात ४ लाख ६१ हजार ३१२ अपघातांची नोंद झाली होती. त्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २५ वर्षांखालील तरुणांची संख्या २५ टक्के आहे.
● आपत्कालीन स्थितीमध्ये मदत मिळण्यास उशीर झाल्याने, प्रथमोपचारांची माहिती नसल्याने, सामाजिक पातळीवर सहभागाचा अभाव यामुळेही बरेच मृत्यू झाले आहेत.
● या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षेबाबत तातडीने जिल्हा, स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज व्यक्त करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, युवक आणि क्रीडा मंत्रालयाने युवा स्वयंसेवकांना सहभागी करून घेणारा ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी देशभरातील १०० जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत.
● उपक्रमामध्ये राज्यातील नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नागपूर, धुळे, यवतमाळ, जालना, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, बुलढाणा, सांगली, मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आहे.
● उपक्रमासाठी उच्च माध्यमिक ते पदवी अभ्यासक्रमाच्या 18 ते 28 या वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
● प्रशिक्षित स्वयंसेवकांकडून हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, वेगमर्यादेचे पालन करणे याबाबत जागृती करण्यात येईल.