Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

रामफोसा यांची द. आफ्रिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड

  • Home
  • Current Affairs
  • रामफोसा यांची द. आफ्रिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड
  • दक्षिण आफ्रिकेत अध्यक्ष सीरिल रामफोसा यांचीच अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.
  • आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि डेमोक्रॅटिक अलायन्स यांच्यात आघाडी झाली आहे.
  • रामाफोसा यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने गेल्या 30 वर्षांत प्रथमच बहुमत गमावले.
  • नुकत्याच झालेल्या सार्वत्रित निवडणुकीत या पक्षाला 40 टक्के मते मिळाली आणि डेमोक्रॅटिक अलायन्सला 20 टक्के मते मिळाली.
  • या दोन्ही पक्षांखेरीज अन्य काही छोट्या पक्षांनी आघाडी करून सत्तेत भाग घेतला आहे.
  • अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत 71 वर्षीय रामफोसा यांनी प्रतिस्पर्धी डाव्या विचारसरणीच्या इकॉनॉमिक फ्रीडम फायटर्स (ईएफएफ) पक्षाचे ज्युलियस मालेमा यांचा पराभव केला.
  • रामफोसा यांना 283 आणि मालेमा यांना फक्त 44 मते मिळाली.
  • तत्पूर्वी, ‘एएनसी’चे थोको डिडिझा यांची सभापतिपदी आणि डेमोक्रॅटिक अलायन्सच्या अॅनेली लॉट्रिएट यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली.

रामफोसा यांच्याविषयी

■ मातेमाला सीरिल रामफोसा यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1952 चा.

■ नॅशनल माइनवर्कर्स युनियन या देशातील सर्वांत मोठ्या खाण कामगार संघटनेचे सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला.

■ माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली 1991 मध्ये ते आफ्रिकी नॅशनल काँग्रेसचे सरचिटणीस झाले.

■ काही काळ राजकारणातून बाजूला राहिल्यानंतर 2012मध्ये पुनरागमन केले आणि जेकब झुमा यांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2018 या काळात उपाध्यक्ष म्हणून काम केले.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून झुमा पायउतार झाल्यानंतर रामफोसा दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झाले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *